मुंबई | अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. बिग बी आणि अभिषेक यांनी ट्विट करत ही माहिती दिली. सोबतच अभिषेकने जनतेला या काळात शांत राहण्याचं आवाहनदेखील केलं. त्यामुळेच बीएमसीने अभिषेकचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांच्या कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, जया बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र अभिषेकचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याविषयीची माहिती देत अभिषेकने नागरिकांना या काळात शांत राहण्याचं आणि स्व:ची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. त्याचं हे ट्विट पाहिल्यानंतर बीएमसीने त्याचे आभार मानले आहेत.
तुम्ही केवळ नियमांचं पालनच केलं नाही तर सगळ्या नागरिकांना शांत राहण्याची आणि काळजी घेण्याचं आवाहनदेखील केलं. त्यामुळे मनापासून तुमचे धन्यवाद. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी आशा करतो”, असं ट्विट बीएमसीने केलं आहे.
अभिषेकने कोणतं आवाहन केल होत?
आज माझी आणि माझ्या वडिलांची म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्हा दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीही करोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो आहे असंही अभिषेक बच्चन यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.