हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका आमदाराला एसीबीकडून समन्स देण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आमदार राजन साळवी यांची एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी केली जाणार आहे. बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांची चौकशी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान एसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर राजन साळवी चौकशीसाठी अलिबागच्या दिशेनं रवाना झाले आहेत. साळवी यांना समन्स बजावण्यात आल्याने
रत्नागिरीत काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे.
सीबीकडून देण्यात आलेल्या नोटिसीबाबत राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर झालेली कारवाई चुकीची आहे. मला बजावलेली नोटीस आयोग्य असून हे सर्व भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे, असा आरोप साळवी यांनी केला आहे.