वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह , सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर खराब असून मागील 10 महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागेल आहे . असे सांगून बिल कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक 1 व 2 यांनी तक्रारदारकडे दिनांक 30/11/2019 रोजी 20, 000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 18,000 ₹ लाचेची मागणी करून सदर लाच आज दि .4/12/19 रोजी आरोपी लोकसेवक क्रमांक 1 वायरमन धनंजय कानडे यांनी पंचासमक्ष मंगळ बाजारात तक्रारदाराच्या दुकानाजवळ स्वीकारली असून , त्यास जागीच ताब्यात घेऊन आरोपी लोकसेवक क्रमांक 2 ठाकूर यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाई मध्ये धनंजय भिका कानडे वय 31 वर्ष वीजवितरण नंदूरबार तंत्रज्ञ आणि जितेंद्र गुलाब ठाकूर वय 38 वर्ष वीजवितरण सहा.लेखापाल नंदूरबार या दोघांना अटक करण्यात अली आहे . हि कारवाई पो. अधिक्षक सुनिल कडासने अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र वि. नाशिक निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाने पोलीस उप अधिक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव , पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे , पो. हवा. उत्तम महाजन , संजय गुमाणे पो. ना. दीपक चित्ते संदीप नावडेकर , अमोल मराठे , मनोज अहिरे , मनोहर बोरसे मपोना ज्योती पाटील आदींनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here