नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला निघालेल्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात (accident) झाला आहे. गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) सासू आणि जावायाचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पंधरा जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी नांदेड- हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ हा अपघात (accident) झाला.
काय घडले नेमके ?
देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाल्याने हे सर्व जण चारचाकीने नांदेडच्या दिशेने निघाले होते. मात्र अत्यविधीला पोहोचण्याआधीच काळाने घात केला. नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ गाडीचे समोरील टायर फुटल्याने त्यांची जीप उलटली आणि हा अपघात (accident) घडला. या अपघातात (accident) सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख महेबूब बाबू शेख असे जावयाचे तर अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख मृत पावलेल्या सासूचे नाव आहे.
अपघातात 15 जखमी
या भीषण अपघातात (accident) 15 जखमी झाले आहेत. पिरसाब नवाबसाब शेख, खाजा मगदूम शेख, फरजना खाजा शेख, खुदबोद्दीन नवाज साब, घाशी साब बाबूसाब शेख, शादुल बाबूसाब शेख, आजमिर महेबूब शेख, खाजा साब मौलासाब शेख, हैदर इस्माईल साब शेख हे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य सात जण या अपघातात (accident) किरकोळ जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर नादेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला : राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर