मुंबईत 4 मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील बोरिवली परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या संपूर्ण बिल्डिंग मध्ये जवळपास १५ ते १६ कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा नगरातील गीतांजली इमारत दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. पोलीस, बीएमसीचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी होती. ही इमारत धोकादायक असल्याचं मनपाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी सकाळीच आपले घर खाली केले होते. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ढिगाऱ्याखाली काहीही नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.