सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे व रामकृष्ण नगर दरम्यान शिवशाही बसचा मोठा अपघात झाला. कारने हुलकावणी दाखवल्याने बस चालकाचा ताबा तुटला आणि हा अपघात झाला. यामध्ये शिवशाही बस पलटी होऊन सहा प्रवासी जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली . पोलीस घटनास्थळी पोचले असून अपघाताची अधिक माहिती घेत आहेत
घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर कारने हुलकावणी दाखवल्याने शिवशाही वरील चालकाचा ताबा सुटला आणि शिवशाही बस महामार्ग नजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये अठरा प्रवासी होते. यापैकी गंगुबाई शिवाजी पुजारी हेमा अण्णाप्पा जाधव सरुबाई अन्नप्पा जाधव अमित अशोक भागवत मोहन सावंत व आणखी एक जण असे सहा जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग हेल्पलाइन इन्चार्ज दस्तगीर आगा बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय देसाई घाडगे हवलदार वाघ तसेच ॲम्बुलन्सचे समीर केंजळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना नागठाने येते उपचारासाठी पाठवले..
दरम्यान याच दरम्यान कराड ते सातारा लेनवर नागठाणे हद्दीत कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एसटी चालकाचा चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस महामार्ग नजीकच्या नाल्यात गेली यामध्ये वीस प्रवासी होते मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही हायवे हेल्पलाइन कर्मचारी तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे