Thursday, March 23, 2023

राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यात झालेल्या पूरस्थितीची पाहणी करताना काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे हा अपघात झाला असून 2 पोलीस कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विश्वजित कदम मात्र सुखरूप आहेत.

विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी अचानक गावातील एक इसम त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला

- Advertisement -

दरम्यान, जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.