एक सीन परफेक्ट करण्यासाठी आमिर तब्ब्ल 12 दिवस राहिला होता आंघोळीपासून दूर, चेहऱ्यावर जमा झाली होती घाण आणि …

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मि. परफेक्शनिस्टची पदवी मिळाली आहे कारण तो त्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी ती व्यक्तीरेखा अक्षरशः जगतो. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कधी तो वजन तर कधी केस आणि मिश्या वाढवतो. आमिर आपल्या चित्रपटात इतका गुंततो की त्याच्या जिवाचीसुद्धा त्याला चिंता नसते. असं म्हणतात की, त्याच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने एक सीन परफेक्ट करण्यासाठी अक्षरशः जीवच दिला होता. आमिर कमी चित्रपट करतो पण त्याचा तोच चित्रपट इतर कोणत्याही अभिनेत्याच्या इतर चित्रपटांवर भारी पडतो.

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘गुलाम’ या चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन सीनमध्ये आमीरला ट्रेनसमोर झेंडा घेऊन पळावे लागते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेन जवळ येण्यापूर्वीच आमिरला उडी मारायला सांगितले होते, पण आमिरने तो सीन परफेक्ट करण्यासाठी अगदी ट्रेनच्या जवळून उडी मारली. याशिवाय या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 12 दिवस लागले. यामधील एका फाइटिंग सीनमध्ये आमिरला चित्रपटाचा खलनायक बरीच मारहाण करतो, ज्यामुळे आमीरचा चेहरा रक्ताने आणि धुळीने माखला जातो.

माध्यमांच्या वृत्तानुसार, हा सीन पूर्ण होईपर्यंत म्हणजेच, तब्ब्ल 12 दिवस तो बिना अंघोळीचा राहिला होता, कारण त्याला हा सीन परफेक्ट बनवायचा होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या सीनची बरीच प्रशंसा देखील झाली. या चित्रपटात आमिर बरोबर राणी मुखर्जी होती. या चित्रपटाचे ‘आती क्या खंडाला ..’ हे गाणे त्यावेळच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

आमिर खान ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात काम करून इतका प्रसिद्ध झाला होता की त्याच्याकडे चित्रपटांची लाईनच लागली होती. आमिरचा चॉकलेट लूक प्रेक्षकांना खूप आवडला. परंतु काळानुसार आमिर खानला एक अभिनेता म्हणून ओळखले गेले ज्याने आपला चित्रपट यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आमिरच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात प्रेक्षकांना त्याची एक वेगळीच शैली आणि गेटअप दिसेल.

You might also like