अमरावती- नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन जण जागीच ठार

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती-नागपूर एक्प्रेस हायवेवर बोरवघलजवळ एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये गाडीतील पन्नाव वर्षीय महिला व चालक जागीच ठार झाले आहेत तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या वर-वधूचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा या ठिकाणी या दाम्पत्याचे लग्न झाले होते. मुलाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आटोपून घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला आहे. पिंपळखुटा येथील वैभव सुरेश गायक यांचे बाभूळगाव येथील तेजस्विनी रमेश बाभळे हिच्यासोबत 23 मार्च रोजी लग्न झाले होते.

जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले
घरफाळ येथील सत्यनारायणाची पूजा आटोपून परत येताना बोरवघळजवळ समोरून येणाऱ्या पिकअपला समोरासमोर धडक झाली. या अपघातात मीराबाई भीमराव बेदुरकर व गाडीचालक गौरव लक्ष्मण ठवकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर वैभव सुरेश गायके,तेजस्विनी रमेश बाभळे आणि नेहा दादाराव बेदूरकर हे जखमी झाले आहेत. या तिघांना उपचारांसाठी सेवाग्राम या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here