बस चालकास भोवळ आल्यामुळे झालेल्या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचुर !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात बस चालकाला आलेल्या भोवळीमुळे अपघात घडला असून यामध्ये सदरील बस अनेक वाहनांना धडकत पुढे गेल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिंतुर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कळमनुरी -औरंगाबाद फेरीवर असलेल्या बस चालकाला धावत्या बस मध्ये भोवळ आल्याने बस थेट शहरातील निळकंट हॉटेल समोरील वाहनावर जाऊन झाडाला धडकत थांबली.

या अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून रस्यावर उभ्या असणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. बस चालक दादाराव संभाजी धनवे (वय 50 ) रा.वाई ता.कळमनुरी जि.हिंगोली बस कळमनूरी असे बस चालकाचे नाव आहे.

सदरील चालक बस क्रमांक MH 13 CU 7543 हि 15 एप्रिल सकाळी दहाच्या सुमारास जिंतूर बस स्थानकातून 40 ते 45 प्रवासी घेऊन कळमनूरी कडे निघाली असता शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात बस चालकाला अचानक भोवळ आल्याने बस वरील ताबा सुटला. यावेळी बस निळकट हॉटेल समोर उभ्या असलेल्या नागरिक व वाहनावर जाऊन थेट झाडावर जाऊन आदळली.

यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे रस्त्याशेजारी उभे असलेले स्थानिक नागरिक बाजूला झाले मात्र यात बस चालक दादाराव धनवे व प्रवाशी सुजाता श्रीकांत बोकसे वय 27, तुळशीराम चंपतराव तारे वय 50 वर्ष,श्रृती गजानन तारे वय 14 वर्ष हे जखमी झाले. यावेळी जखमींना नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली असून घटनास्थळावर उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave a Comment