Monday, January 30, 2023

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; कोणाला कोणते मंत्रिपद

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर झालं आहे. या नव्या सरकारमध्ये आत्तापर्यंत १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र खातेवाटप अजूनही रखडलं होत. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने खातेवाटप जाहीर केलं असून ही यादी राज्यपालांनी मंजूर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन ही खाती आपल्याकडे ठेवली आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखाते आणि अर्थखाते हि महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. यासह विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्ठाचार ही खातीही फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली आहेत. संपूर्ण खातेवाटपावर लक्ष दिल्यास देवेंद्र फडणवीस यांचीच छाप दिसत आहे.

कोणाला कोणते मंत्रिपद-

- Advertisement -

विखे पाटील- महसूल खाते, पशु संवर्धन, दुघविकास

सुधीर मुनगंटीवार- वनमंत्री, सांस्कृतिक कार्य व मस्त्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्र शिक्षण खाते, वस्त्रोद्योग,

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना

विजयकुमार गावित- आदिवासी विकास खात

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा मंत्री

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन खात

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

दादा भुसे- बंदरे आणि खनिकर्म खात

सुरेश खाडे- कामगार मंत्री

गिरीश महाजन- ग्रामविकास आणि पंचायत राज खात, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण

रवींद्र चव्हाण- बांधकाम मंत्री

दीपक केसरकर- शालेय शिक्षणमंत्री

तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

उदय सामंत- उद्योग मंत्री

अतुल सावे- सहकार मंत्री

अब्दुल सत्तार- कृषी मंत्री

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजगता खातं