हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या छोट्या मोठ्या नोकरीतून 10 करोड रुपये जमा करायला सांगितले तर ते शक्य होतील का? नाही. कारण 10 करोड रुपये ही खूप मोठी किंमत आहे. जी महिन्याच्या कमी पगारातुन जमा करणं अशक्य आहे. त्यातच आता महागाई वाढत असल्यामुळे बऱ्याच जणांना त्यांचा महिन्याचा पगार देखील पुरत नाही. मग एक साधारण नोकरी करणारा व्यक्ती 10 कोटींचा मालक कसा काय बनू शकतो. याला अपवाद जर आपली इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो. मग ते 10 करोड रुपये जमा करणं असो किंवा दुसरं काही. ते कसं तर बरेच वर्ष आपण गुंतवणूक करत राहिलो तर 10 कोटी रुपये जमा करणं काही अशक्य नाही. मग ही गुंतवणूक आपण कोठेही करू शकतो. नेमकं कुठे पाहूया
तुम्ही म्युच्युअल फंड हे नाव ऐकलं असेल. यामध्ये असलेली एक छोटीशी पद्धत म्हणजे एसआयपी SIP. यामध्ये आपण 500 रुपयांपासून सुरुवात करू शकतो. म्हणजे 10, 20, 30 वर्ष जर आपण असं केल तर 10 कोटी जमायला वेळ लागणार नाही. यासोबतच भविष्याची काळजी देखील भासणार नाही. जर 500 रुपयांनी सुरु करून जर 10- 20 वर्ष वर्षात 10 कोटी जमवायचं म्हंटल तर ते अवघड आहे. पण आपण जर हीच किंमत वाढवली तर हे अशक्य नाही.
जर वार्षिक रिटर्न फक्त 12% असेल, तर तुम्हाला 10 वर्षांत 10 कोटी रुपयांसाठी दरमहा 4.30 लाख रुपये गुंतवावे लागतील. पण जर तुम्हाला 15% परतावा मिळत असेल, तर दरमहा 3.60 लाख रुपये SIP मध्ये टाकावे लागतील. जर तोच रिटर्न जर आपण 18% धरला तर तुम्हाला दर महिन्याला 2,95,000 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच सर्वसामान्य कुटुंबासाठी हे काम अवघड आहे.
20 वर्षात 10 कोटी कसे मिळवायचे
जर आपण 20 वर्ष गुंतवणूक केली आणि 12% वार्षिक रिटर्न मिळवला, तर दरमहा सुमारे 1 लाख रुपये SIP करून 10 कोटी रुपये जमा करू शकतो. जर तुम्हाला 15% वार्षिक रिटर्न मिळत असेल, तर 20 वर्षांनंतर, तुम्हाला 10 कोटी रुपयांसाठी म्युच्युअल फंडात दरमहा 66,000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही 18% परतावा बघितला तर 20 वर्षांसाठी दरमहा 43000 रुपयांची SIP करावी लागेल.
तुम्ही 30 वर्षांत 10 कोटी रुपये सहज उभारू शकता
तसेच आपण जर अजून 10 वर्ष वाढवलं तर हे ध्येय गाठने काही अवघड नाही. जर 30 वर्षांचा कालावधी असेल तर दरमहा 28 हजार च्या SIP वर 30 वर्षात 12% वार्षिक परताव्याच्या आधारावर पोर्टफोलिओमध्ये एकूण 10 कोटी रुपये जमा केले जाऊ शकतात. दरमहा केवळ 14 हजार 300 रुपयांच्या एसआयपीवर 30 वर्षांत 10 कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, परंतु त्यासाठी 15% वार्षिक रिटर्न द्यावा लागेल.
चक्रवाढ व्याजासाठी दरमहा 7 हजार रुपयांच्या SIP वर 30 वर्षांत 10 कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, ज्यावर वार्षिक 18% रिटर्न जोडला जातो. जे आपल्यासाठी सहज शक्य आहे. दरमहा 30 ते 40 हजार रुपये कमावणारे प्रत्येकजण 7000 महिन्यांची बचत करून म्युच्युअल फंडात SIP करू शकतो. अशाप्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडावर पैसे गुंतवू शकता. जर तुम्ही 20 ते 30 वर्षे नियमितपणे गुंतवणूक केली तर थोड्या रकमेतून मोठा फंड जमा करणं अशक्य नाही.