धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वडखळ : हॅलो महाराष्ट्र – पेण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला पेण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव श्रेयस सुरेश बाटे असून त्याने पेण शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर बलात्कार केला आहे.

आरोपी श्रेयस सुरेश बाटे याने 1 डिसेंबर 2020 ते 8 जून 2021 या कालावधीत सदर अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याने ही अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती राहिली. या विरुद्ध अल्पवयीन मुलीच्या आईने पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आईने दिलेल्या फिर्यादीवरून पेण पोलिसांनी संशयित आरोपी श्रेयस बाटे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.या प्रकरणाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण ,पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.