टीम, HELLO महाराष्ट्र। देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. परंतु या वाढत्या घटनांच्या तुलनेत गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे समजतून देखील वारंवार नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते. त्यामुळेच बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ शिक्षा मिळावी यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं दिशा विधेयक मंजूर केलं आहे.
देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना आंध्र प्रदेश सरकारनंहे विधेयक मंजूर केल्याने. समाजातून त्याचं स्वागत करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आज या विधेयकावर मतदान घेण्यात आले आहे. त्यामुळे आता बलात्काराच्या प्रकरणात अवघ्या २१ दिवसांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे.
तसेच हे विधेयक मंजूर झाल्याने पोलिसांना 7 दिवसांत बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण करावा लागेल. यानंतर 14 दिवस याबद्दल न्यायालयीन सुनावणी होईल. त्यामुळे 21 दिवसांत गुन्हेगारांना फासावर चढवण्यात येणार आहे. दरम्यान आंध्र प्रदेशच्या शेजारी असलेल्या तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणांमध्ये वेगानं न्याय दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळेच आंध्र प्रदेश सरकारनं विधानसभेत दिशा विधेयक मांडलं आहे.