Monday, February 6, 2023

ऊसदर आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
उसाला चांगला दर मिळावा, यासाठी 2013 मध्ये पाचवड फाटा येथे झालेल्या ऊसदर आंदोलनातील खटल्याचा निकाल आज लागला. यात शेतकरी नेत्यांसह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व शेतकऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. बळिराजा शेतकरी संघटनेने न्यायालयाच्या निकालानंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून फटाके वाजवून जल्लोष केला.

बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, 50पैकी 49 खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला आहे. केवळ एक खटला सुरू होता. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्यासह सांगली जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे, शंकर शिंदे, उत्तम खबाले, आदित्य जाधव, शंकर विटक्के या सहा जणांचा समावेश होता.

- Advertisement -

सदरचा खटला 2013 पासून सुरू होता. आज त्याचा निकाल लागून सर्व संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या निकालानंतर बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने येथील दत्त चौकात फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.