मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारस असल्यासारखे वागा : खेडेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपालांना दिले. या पत्रावरून आज संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मराठा आरक्षणाबाबत प्रधानमंत्रींना पत्र लिहणे म्हणजे हे हाथ झटकण्याचा प्रकार आहे. बाळासाहेबांचे वारस आहात तसे वागा. बारामतीची हवा लागू देऊ नका उद्धवसाहेब..” अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे महासचिव खेडेकर यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहलं आहे. “न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे केंद्रातील मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्याला मराठा आरक्षण देता येते का? हे पाहून ते जर शक्य असेल तर ते देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक असणारी पावलेही उचलावीत. याचबरोबर मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी,” अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

आता मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंवर विविध पक्षांकडून टीका केली जाऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मराठा समाजातील विविध संघटनांकडून अनेक आरोप केले जातील. काल मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत महाविकास आघाडीने राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून भाजपकडूनही टीकास्त्र सोडले गेले. तर एखादे शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना पत्र देता येत का? एखाद पत्र दिलं कि मराठा समाजाला आरक्षण मिळते का? राज्याला मराठा आरक्षण देता येणे शक्य असते तर राज्यपालांनी तसे केले असते. असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही आघाडी सरकारवर निशाणा साधला.