कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शासनाच्या नियमानुसार कोरोनाला रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र तरीही काही दुकानदार नियमाचे उल्लघंन करत असल्याचे दिसून येत आहे. या उल्लघंन करणाऱ्या एक मोबाईल व एक कापड दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
कराड शहरातील नामांकित शिवाजी मार्केटमधील मानव टेक्सटाईल व विजय दिवस चाैकातील स्माईल मोबाईल शाॅपी या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. मानव टेक्सटाईल या दुकानांवर पोलिस उपअधिक्षक डाॅ. रणजित पाटील व त्याच्या टीमने कराड पालिका प्रशासनाच्या सहकार्याने कारवाई केली. तर स्माईल मोबाईल शाॅपीवर वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांनी आपल्या टीमसोबत पालिका कर्मचाऱ्यांच्या सोबत कारवाई केली.
नियमांचे उल्लघंन करून दुकाने चालू ठेवल्याबद्दल तीन हजार रूपये दंड तसेच सात दिवस बंद ही कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डीवायएसपी डाॅ. रणजित पाटील यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा