Tuesday, June 6, 2023

धोनीने आयपीएलमध्ये केला ‘हा’ मोठा विक्रम जो अजून कोणालाच जमला नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमध्ये सुद्धा आपली छाप पाडली आहे. आताच्या आयपीएलमध्ये धोनीला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी तो कर्णधार आणि विकेटकिपर म्हणून कुठेच कमी पडला नाही. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने १८ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्व्ल स्थान देखील मिळवले.

या सामन्यात धोनीने आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात धोनीने कोलकाताच्या तीन फलंदाजांचे कॅच घेऊन त्यांना आऊट केला. यामध्ये नितिश राणा, राहुल त्रिपाठी आणि इयान मॉर्गन यांचा समावेश आहे. या तीन कॅच घेऊन धोनीने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात विकेटकिपर म्हणून १५० कॅच पूर्ण करणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीने २०८ सामन्यातील २०१ डावात १५१ कॅच घेऊन हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर आयपीएलमध्ये विकेटकिपर म्हणून सर्वाधिक कॅच घेणाऱ्या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिनेश कार्तिकने २०० सामन्यात १४३ विकेट घेतल्या आहेत. तर रॉबिन उथप्पा हा ९० कॅच घेत तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये विकेटकिपर म्हणू्न सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू
१) एमएस धोनी- १५१
२) दिनेश कार्तिक- १४३
३) रॉबिन उथप्पा-९०