आंतरराष्ट्रीय | 22 वर्षीय पाकिस्तानी ब्लॉगर, ISI आणि सैन्यावर टीका करणाऱ्या पत्रकाराची हत्या करण्यात आली. त्याचे नाव मुहम्मद बिलाल खान असे होते. मुहम्मद बिलाल खान यांचे समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर चाहते होते. ट्वीटर वर सोळा हजार,फेसबुक वर बावीस मित्र आणि युटयूब वर अठ्ठेचाळीस हजार लोक त्यांना फोलो करत होते.
शहरातून बाहेर निघून जाण्यासाठी त्याला एक फोन आला होता असे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे. त्याला मारण्यासाठी मारेकर्यांनी खंजिरीचा वापर केला होता. तसेच काही लोकांनी घटना स्थळी गोळीबाराचा आवाज देखील ऐकला होता असे पोलीस अधीक्षक सद्दार मलिक नइम यांनी सांगितले. या घटनेत श्रीमान खानचा मित्र जखमी झाला.
समाज माध्यमावर सक्रीय असण्यासोबत खान हे एक स्वतंत्र पत्रकार देखील होते. त्यांची हत्या झाल्यानंतर लगेच #Justice4MuhammadBilalKhan हा कल समाज माध्यमावर सुरू केला गेला. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी असे म्हटले आहे की “पाकिस्तानी सैन्यावर टीका आणि ISI वर टीका केल्या मुळे त्यांची हत्त्या करण्यात आली.” त्याचे वडील अब्दुल्ला म्हणाले की, “त्याच्या शरीरावर एका तीक्ष्ण हत्याराचे व्रण होते, माझ्या मुलाचा एकमेव दोष म्हणजे तो संदेष्टाबद्दल बोलला”. दहशतवाद विरोधी कलम (Anti Terrorism Act.) आणि इतर कलमांसह संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.