अभिनेता अनिरुद्ध दवे महिन्याभरापासून देतोय कोरोनाशी झुंज ; ट्विटरवर शेअर केली भावुक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘पटियाला वेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवे गेल्या ३६ दिवसांपासून अर्थात महिन्यापेक्षा जास्त दिवस कोरोना विषाणूशी लढतोय. अद्यापही तो उपचारांसाठी रूग्णालयात आहे. अर्थात आता त्याची प्रकृती वेगाने सुधारत आहे. त्याला आयसीयू वॉर्ड मधून बाहेर जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. अनिरूद्धने स्वत: ट्विटरवर आपल्या तब्येतीबद्दल माहिती देत एक पोस्ट शेअर केली आहे.

एक फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘३६ व्या दिवशीही झुंज कायम आहे. आताही ऑक्सिजन सपोर्टवर आहे. पण फुफ्फुसांमध्ये रिकव्हरी आहे. डॉ. गोयंका यांनी जास्त बोलण्यास मनाई केली आहे. मात्र रिप्लाय देण्यास, प्रियजनांच्या संपर्कात राहण्याची परवानगी आहे. चित्रपट आणि शो पाहण्याचीही परवानगी दिली गेली आहे. नवे आयुष्य मिळाले आहे. जणू माझा नवा जन्म झाला, असे वाटतंय. आता मी वॉक करणार. सेल्फी तो बनती है… तुम्हा सर्वांचे आभार…’ अनिरूद्धच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी तो लवकरात लवकर बरा होऊन घरी परतावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

अभिनेता अनिरूद्ध दवे याला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. अनिरूद्ध भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या चित्रीकरणासाठी गेला होता. यादरम्यान त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि यानंतर आणखी बिघडतच गेली. त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते आणि त्याच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. दरम्यान त्याला अश्याच गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/COArAFmBIug/?utm_source=ig_web_copy_link

तेव्हापासून तो रूग्णालयातच आहे. गेल्या महिन्यात अनिरूद्धला आयसीयूबाहेर शिफ्ट केले आहे. पण अद्यापही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. अनिरुद्ध टीव्ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने शक्ति अस्तित्व के एहसास की, पटियाला बेब्स या आणि अश्या बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच लवकरच तो अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बेलबॉटममध्येही दिसणार आहे.

Leave a Comment