हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच भाजप पक्षाची स्तुती करताना दिसतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असल्याचे देखील मानले जाते. पण आता त्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यांची चक्क एका मुलाखती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केल्या आहेत. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. अनुपम खेर यांचे मोदी सरकारच्या नाकर्तेपणाविषयी भाष्य करणे हे सर्वांसाठी अगदी आश्चर्यजनक बाब आहे.
https://www.instagram.com/p/COvfj3vM1ln/?utm_source=ig_web_copy_link
सध्या बिहारमध्ये कोरोनाने मृत्यु झालेल्या रूग्णांचे प्रेत सापडत आहेत. या प्रकरणात सरकारवर जी टीका होतेय ती योग्य आहे. या परिस्थितीत सरकारने योग्य ते काम करावं. ज्यासाठी त्यांना निवडून दिलं आहे. देशात आज जी काही परिस्थिती आहे, त्यावर कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेतं यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही, अशी धारदार टीका अनुपम खेर यांनी केली आहे.या मुलाखती दरम्यान आपण देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला जाब विचारला पाहिजे, असंही अनुपम खेर म्हणाले.
https://www.instagram.com/p/COUXGOysa66/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या भावना योग्यवेळी व्यक्त केल्या पाहिजेत, असे वक्तव्य अनुपम खेर यांनी केले आहे. केंद्रातील सरकार कुठे न कुठे कमी पडले असून आता स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे, अशी सणसणीत टीका अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर केली आहे. एनडीटीव्हीच्या एका मुलाखतीत ते बोलत असताना काश्मीर मुद्यावर पुन्हा एकदा भाष्य करताना दिसले. कलम ३७० रद्द केल्यानंतर अनुपम खेर यांनी भाजपचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तेव्हापासून ते भाजपच्या विचारांशी जवळीक आहे असे म्हटले जात होते. मात्र यावेळी त्यांनी सरकारवर साधलेला निशाणा योग्य ठिकाणी लागला कि नाही हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.