कुणी हात जोडले, कुणी पाया पडले तर कुणी पदर पसरले; यावर सोनूने काकुळतीने म्हटले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महाभयंकर महामारीशी लढा देत आहे. अश्या काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी अगदी देवदूतासारखा धावला आहे. त्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान अनेक मजदूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. तर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू अनेकांना रुग्णालयात बेड, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर आणि इंजेक्शन मिळवून देत आहे. त्याच्या या मदत्कार्यामुळे अनेकांना नवे जीवन मिळाले आहे. अनेकांनी आपले प्रियजन सुखरूप मिळवले आहेत. यामुळे सोनू लोकांची आशा होऊ लागला आहे. नुकताच एक व्हिडीओ वायरल झाला आहे. ज्यात लोक सोनूच्या अगदी पाया पडत मदत मागताना दिसत आहेत. मात्र सोनुने त्यांना असे न वागण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पुन्हा सोनुने मन जिंकले.

https://www.instagram.com/p/CPNtdMWDcB6/?utm_source=ig_web_copy_link

सोनूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही लोक सोनूला हात जोडताना दिसत आहेत तर काहीजण पाया पडताना दिसत आहेत. सोनूचा हा व्हिडिओ वीरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सोनू घराच्या बाहेर उभा असून तो लोकांच्या समस्या ऐकताना दिसत आहे. लोक त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही असे करू नका…. असे सोनू त्यांना काकुळतीने सांगताना दिसत आहे. सोनू सूद पाया पडू नका असे अक्षरशः हात जोडून लोकांना सांगत आहे. हा व्हिडिओ पाहून सोनू सूदचे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चांगलेच कौतुक होत आहे.

https://www.instagram.com/p/COfJInCDWaq/?utm_source=ig_web_copy_link

सोनू सोशल मीडियाद्वारे अनेकांना मदत करत असतो. त्यामुळे अनेकदा लोक मदत मागण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचतात. याआधीही असाच एक व्हिडीओ वायरल झाला होता. त्यावेळी सोनूने घराच्या बाहेर येऊन लोकांच्या समस्या ऐकल्या आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. गतवर्षापासून सोनू सूद वन मॅन आर्मी फोर्सप्रमाणे काम करीत आहे. त्याच्या मदतीचा ओघ पाहून कित्येकांचा उर भरून येतो.

https://www.instagram.com/p/CO5YZy9AVlH/?utm_source=ig_web_copy_link

मात्र निश्चितच हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कि एक माणूस एवढं करू शकतो तर करोडो लोक काय काय करू शकतील.. पण विचार धारणेच काय..? प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत सोनुसारखी तर नसेल ना.. पण आतापुरता सोनू खरोखरीच लोकांसाठी देवासारखा धावून आला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

Leave a Comment