५० रुपया काट ओव्हर अ‍ॅक्टिंग का..; अभिनेत्री हिना पांचाळ झाली ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचा कहर सुरु आहे. कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम एकदम जोरात सुरु आहे. अशात अनेक कलाकार लस घेताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या लसीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणे, हा कायतरी नवा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यांचे हे फोटो आणि व्हिडीओ जबरदस्त व्हायरलसुद्धा होताना दिसत आहेत. मात्र यामुळे अनेक सेलिब्रिटींना नेटकऱ्यांच्या ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. लस घेताना हे सेलिब्रेटी इतकी नाटकं करतात की त्यांचे असे वागणे पाहून चाहत्यांचा संताप होतोय. नुकतेच अभिनेत्री हिना पांचाळचा लस घेतानाचा व्हिडीओ चांगलाच वायरल होतोय आणि त्यासोबत हिना ट्रोल.

https://www.instagram.com/p/COxulQ3Bi_p/?utm_source=ig_web_copy_link

‘बिग बॉस’ मराठी सीजन २ या शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री हिना पांचाळ सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे, तिचा लस घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हिना अशी काही नाटकं करतेय कि ते पाहून तिला इंजेक्शनचा किती त्रास होतोय आणि आपल्याला हे पाहण्याचा त्रास किती..? असाच प्रश्न पडतोय. हिनाचा हा व्हिडीओ पाहून तिला नेटीझन्स भयंकर ट्रोल करत आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेक विविध कमेंट्स करत लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CMw-dmJhid9/?utm_source=ig_web_copy_link

”ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान” , ‘५० रुपया काट ओव्हर ऍक्टिंग का”, इथे सर्वसामान्यांना लस घेण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. इथे या सेलिब्रेटींना मिळतेय तर तिथेही हे बालिशचाळे करून इतरांचा वेळ वाया घालवतायत. अश्या पद्धतीच्या कमेंट्स करीत लोक तिच्या नखऱ्यांना विरोध करीत तिला ट्रोल करीत आहेत.

   

आजकाल जो सेलेब्रिटी लस घ्यायला जातोय तो प्रत्येकजण सुईला घाबरून आ, वुई करताना दिसतोय. सगळ्यांनाच कशी काय इंजेक्शनची भीती वाटते काय माहित, पण यांचे हे नखरे लोकांना काही सहन होणारे नाहीत. हिना पांचाळच नाही तर या आधीही अनेक सेलिब्रेटी लस घेताना असेच नखरे करत होते. मुख्य म्हणजे ते हि असेच ट्रोल झाले. मात्र नखरे करून दाखवायची सवय काही गेली नाही.

Leave a Comment