कंगनाने दिले शिवसेनेला ओपन चॅलेंज; म्हणाली, काय वाकडं करायचंय ते करा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना मात्र, कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनचं आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने शुक्रवारी सकाळीही ट्विट करून शिवसेनेला डिवचले होते. अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे कंगना राणौतने म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment