अजून किती जणांचा गळा दाबणार ?? ; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर कंगणाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

0
33
kangana and uddhav thakarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिकन टिव्हीचे संस्थापक अर्णब गोस्वामी याना अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी अर्णब यांना वरळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. कलम ३०६ अंतर्गत अर्णबवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

याबाबत कंगनानं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेचा सोनिया सेना म्हणून उल्लेख केला आहे. कंगना म्हणाली की, अर्णब गोस्वामींना घरात घुसून पोलिसांनी मारलं, अटक केली, किती घरं तोडणार?, किती जणांचा गळा दाबणार? कोणाकोणाचे आवाज बंद करणार? सोनिया सेना किती जणांची तोंड बंद करणार? असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे.

तसेच आमच्याआधी किती शहिदांचे गळे कापले, त्यांना लटकवलं गेले आहे. एक आवाज बंद केला तर अनेक आवाज उभे राहतील, पेग्विंन बोलल्यानं राग का येतो? पेग्विंनसारखे दिसता तर बोलणारच, पप्पू सेना म्हटल्यावर राग येतो, तुम्ही सोनिया सेनाच आहात अशी टीका अभिनेत्री कंगना राणौतनं केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. इथे सर्व काही कायद्याने चालते. अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ठाकरे सरकारचा याप्रकरणी काहीही संबंध नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. तसेच मुंबई पोलीस सूड भावनेने कोणावर अन्याय करत नाहीअसेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here