‘या’ अभिनेत्रीला सख्ख्या भावाची हत्या केल्याप्रकरणी अटक

Shanaya Katwe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कर्नाटक : वृत्तसंस्था – आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. शनायाने राकेश काटवे याची हत्या करुन त्याचा मृतदेहाचे तुकडे करून ते विविध ठिकाणी फेकले होते. हि हत्या ४ जणांनी मिळून केली होती. राकेशचे कापलेले डोके देवरागुडीहलाच्या जंगलात सापडले तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रोडवर सापडले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.धारवाड़ जिल्हा पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक केली आहे. या हत्येमध्ये नियाज अहमद कटिगार,तौसीफ चन्नापुर,अल्ताफ मुल्ला,अमन गिरानीवाले यांचा समावेश होता.

चित्रपटाचं प्रमोशनसाठी गेली होती शनाया
९ एप्रिल रोजी राकेशची हत्या करण्यात आली. राकेशची हत्या झाली त्यावेळी शनाया आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळी या ठिकाणी गेली होती. राकेशची हत्या गळा दाबून करण्यात आली. हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नियाज अहमद व त्याच्या साथीदारांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते शहरात विविध ठिकाणी फेकले.

गुरुवारी अभिनेत्रीला केली अटक
गुरुवारी शनायाला अटक करून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शनायाने राघवंका प्रभूद्वारा निर्देशित २०१८ मध्ये चित्रपट इदम प्रेमम जीवनम या कन्नड चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.