मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आज रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलं आहे. लवकरच तिच्या रक्ताचीही चाचणी करण्यात येणार आहे. सलग तिसर्या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव पुढे आले. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिचे घेतले गेले होते. तिचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने रियाला एनसीबीने ताब्यात घेतले होेते. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती.
Actor Rhea Chakraborty arrested by Narcotics Control Bureau (NCB) in Mumbai: KPS Malhotra, Deputy Director, Narcotics Control Bureau pic.twitter.com/aB4zKOoawL
— ANI (@ANI) September 8, 2020
त्याप्रमाणे एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आतापर्यंत रियाने ती कोणतंही व्यसन करत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचं मान्य केलं. तसंच ती स्वतः अमली पदार्थांचं सेवन करत नसून फक्त सुशांतसाठी मागवायची असंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
आज मंगळवारी मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.