विशेष अधिकार वापरत पाचगणीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून पर्यटन सेवा बंद ; स्थानिक व्यापाऱ्यांचीही निराशा

सातारा प्रतिनिधी | कोव्हीड 19 या रोगाच्या पार्श्वभुमीवर पाचगणी येथील लॉजिंग आणि हाॅटेल व्यवसाय सुरक्षिततेचे उपाय करत सुरु करावे असा आदेश जिल्हाअधिकारी सातारा यांनी दिला आहे. मात्र पाचगणी नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सात महिन्यांपासून पर्यटनावर आपली चुल चालवणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार दापकेकर यांनी करायला हवा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पर्यटन हा पाचगणीकरांचा उत्पन्नाचा मोठा आणि मुख्य स्त्रोत आहे. पर्यटनाच्या संधी शोधून त्या विकसीत करणं सध्या गरजेचं असून त्याचा थेट संबंध रोजगार निर्मीतीशी आहे. मात्र याच विसर पडलेल्या दापकेकरांना पाचगणीत कोरोना परिस्थिती बिकट होईल अशी भीती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरु करावी की नाही याचे सर्वाधिकार स्थानिक संस्थांना दिले आहेत.

याचाच परिपाक म्हणून पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरत गर्दीच्या कारणास्तव पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पाचगणी शहरातील १७१ घोडे व्यावसायिक मागील ७ महिन्यांपासून पर्यटन बंद असल्याने हवालादिल झाले आहेत. टॅक्सी व्यवसाय अडचणीत असल्याने स्थानिक भूमिपुत्रांवर कर्जाचा डोंगर उभा आहे. कोव्हीड १९ या रोगाच्या साथीत सगळं जीवनमान बेचिराख झालं आहे.

अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात राज्याशासनच्या नवीन नियमावलीत प्रवासाववरील निर्बंध उठले आहेत. त्यामुळे आॅनलईन हाॅटेल बुकिंग करत पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरला येऊ लागले आहेत. सुरक्षिततेचे उपाय आणि सावधनता बाळगत सूक्ष्म पर्यवेक्षण करत पाचगणीतील काही पर्यटनस्थळं तरी सुरु करुन सर्वसामान्यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लावावा अशी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.

You might also like