अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला निर्माते साजीद खानवर लैंगिक छळाचा आरोप; म्हणाली, त्याने पॅन्ट काढून मला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक साजीद खान यांच्यावर पुन्हा एकदा लैंगिक छळाचा आरोप झाले आहेत. आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ६ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर शर्लिनने साजीद खानची भेट घेतली होती. तेव्हा साजीद खानने केलेल्या कृत्याचे कथन शर्लिनने ट्विट करून केले आहे. २००५ मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी मी जेव्हा त्याला भेटले, तेव्हा त्याने त्याच्या पॅन्टमधून त्याचे लिंग बाहेर काढले आणि मला त्याची अनुभूती घ्यायला सांगितले. लिंगाची कशी अनुभूती असते हे मला माहीत आहे. तुला भेटण्याचा माझा उद्देश तुझ्या लिंगाची अनुभूती घेणे किंवा त्याचे रेटिंग करणे नाही, असे मी त्याला सांगितलेले मला आठवते, असे ट्विट शर्लिनने केले आहे.

शर्लिनने केलेल्या आरोपामुळे साजीद खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माझे वडिल डॉ. प्रेमसागर चोप्रा यांच्या निधनामुळे मी आधीच भावनिकदृष्ट्या तुटलेले होते. चित्रपट निर्मात्याने मला भेटीसाठी बोलावले होते. ही भेट त्याच्या लिंगाभोवतीच केंद्रित असेल हे मला माहीत नव्हते, असेही शर्लिनचे म्हणणे आहे. त्याच्या लिंगाला मी स्पर्श करावा म्हणून त्याने अनेकदा प्रयत्न केले. स्वतःची स्वतःच मदत हा उत्तम पर्याय असल्याचे सांगत मी त्याला त्याचे लिंग त्याच्यात हातात पकडून हस्तमैथून करण्याचा सल्ला दिला होता, असेही शर्लिनने म्हटले आहे. एवढे मोठे लिंग तू कधी पाहिले का, असेही तो म्हणाल्याचे शर्लिनने म्हटले आहे.

जॉनी सिन्स बनायचे असेल तर बेशक बना, परंतु चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मुलींना बोलावून, त्यांना आपले लिंग दाखवणे आणि त्यांना आपल्या लिंगाला स्पर्श करायला सांगणे ही कुठली संस्कृती आहे? असा सवालही शर्लिन चोप्राने केला आहे. जर हातामध्ये लिंग देण्याचा एवढाच शौक आहे तो पॉर्न फिल्म का करत नाही? दररोज एखाद्या नव्या मुलीकडून तुमच्या लिंगाला स्पर्श करून घेता येईल, असेही शर्लिनने म्हटले आहे.

साजीद खान यांच्यावर या आधीही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. अभिनेत्री जिया खानची बहीण करिश्मा हिनेही साजीदवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. रिहर्सलदरम्यान जिया स्क्रीप्ट वाचत असताना साजीद खानने तिला तिचा टॉप आणि ब्रा काढायला सांगितले होते. तेव्हा तिने अजून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले नाही आणि हे काय सुरू आहे, असे सांगितले होते. असा आरोप करिश्माने केला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’