गायक अदनान सामीला पद्मश्री दिल्यानं अभिनेत्री स्वरा भास्कर सरकारवर संतापली; म्हणाली..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार देण्यावरून सरकारला लक्ष्य केलं. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)च्या निषेधार्थ इंदूर येथे आयोजित ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या मोर्चात स्वरा भास्करने भाग घेतला होता. या मोर्चात उपस्थितीतांना संबोधित करताना स्वरा म्हणाली, ‘निर्वासितांना नागरिकत्व देण्याकरिता आणि घुसखोरांना पकडण्यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया या देशात आधीच अस्तित्वात आहे, आणि याच प्रक्रियेअंतर्गत सरकारने अदनान सामी यांना भारतीय नागरिकत्व दिले आणि आता त्यांची निवड पद्मश्रीसाठी केली.

एकीकडं ‘तुम्ही आम्हाला (सीएएविरोधी निषेध करणार्‍यांना) शिवीगाळ करा, आमच्यावर लाठी हल्ला करा, अश्रू धुराच्या नळकांड्या फोडा आणि दुसरीकडं एका पाकिस्तान वंशाच्या नागरिकाला पद्मश्री द्या! हा कुठला न्याय आहे. हे लोक आम्हाला तुकडे-तुकडे गॅंगचे सदस्य, देशद्रोही आणि माहित नाही अजून क्या काय म्हणतात, पण खरं काय आहे ते जनतेला माहित आहे. ‘ असं स्वरा यावेळी म्हणाली.

un (23)

स्वराने सीएएच्या विरोधात हजारो लोकांच्या उपस्थितीत, हा कायदा करून घटनेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला. ती म्हणाली, ‘सीएए आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) बद्दल असे सांगितले जात आहे की घुसखोरांनी देशात प्रवेश केला आहे. पण हे घुसखोर आम्हाला का दिसत नाहीत? असा सवाल स्वराने उपस्थित केला.

स्वरा पुढे म्हणाली, ”मूळ समस्या ही आहे की घुसखोरांनी सरकारच्या मनात प्रवेश केला आहे, कारण सरकार पाकिस्तानच्या एकतर्फी प्रेमात पडले आहे. सरकारला सर्व ठिकाणी पाकिस्तानीचं दिसतात. माझ्या आजीने जितक्या वेळा हनुमान चालीसा वाचली नसेल त्यापेक्षा हे सरकार पाकिस्तानच्या नावाचा जप करत राहते.” अशी खोचक टीका स्वराने यावेळी केंद्र सरकारवर केली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

धोनीच्या निवृत्तीबाबत कपील देव म्हणाले …

सीएए विरोधात शाहीनबागमध्ये सुरु असलेलं आंदोलनं योगायोग नाही, एक कारस्थान आहे- पंतप्रधान मोदी

‘हे गांधी किंवा खानचे सरकार नाही!’ भाजप खासदार परवेश वर्माने पुन्हा एकदा केलं वादग्रस्त विधान