हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मानं ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबूल’ या मालिकेच्या सेटवर 24 डिसेंबरला आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतरचा शेवटचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सेटवर मेकअप रुममध्ये तुनिषाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मेक अप रुमचा दरवाजा तोडून तुनिषाला बाहेर काढण्यात आल्यानंतर शीजान आणि सेटवरच्या दोघांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले.
तुनिषाने सेटवर मेकअप रुममध्ये गळफास घेतल्यानंतर तिला जेव्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हाचा हा व्हिडीओ समोर आला असून रुग्णालयच्या बाहेरील हा व्हिडिओ आहे. ज्यात शीजान खान आणि अन्य दोघं जणं तुनिशाला उचलून रुग्णालयात नेताना दिसत आहेत. रुग्णालयाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज असून यात एक व्यक्ती रुग्णालयात धावत जाताना दिसत आहे, यात एक सफेद रंगाची कारही दिसत आहे.
कारमधून शीजान आणि इतर दोघंजणं तुनिशाला घेऊन बाहेर पडतात, आणि सर्व जण रुग्णालयाच्या दिशेने धावत जाताना दिसत आहेत. एकाने तुनिषाला उचलून घेतले असून सर्वजण खुपच तणावात दिसत आहेत. लवकरात लवकर तुनिषाला उपचार मिळावेत यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओत तुनिषा आणि शीजान हो दोघंही अलीबाबा मालिकेच्या कपड्यांवर दिसत आहेत. यावरुन मालिकेची शुटिंग सुरु असताना घडलेल्या घटनेनंतर झालेली परिस्थिती लक्षात येत आहे.
तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या अवघ्या काही सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज#TunishaSharma #SheezanKhan #CCTV #TunishaSharmaDeath pic.twitter.com/Qic24126ig
— Harshal Jadhav (@harshal_rj) December 27, 2022
‘त्या’ दिवशी सेटवर तुनिषाबाबत नेमकं काय घडलं?
‘अलिबाबा: दास्तान-ए-काबूल’ या मालिकेच्या सेटवर 24 डिसेंबरच्या दिवशी इतर दिवसांसारखीच शुटिंग सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीजान आणि तुनिषाने एकत्र लंच केला. त्यानंतर शीजान शुटिंगसाठी सेटवर गेला. या लंचदरम्यानच शीजान आणि तुनिषामध्ये काहीतरी बिनसल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळेच तुनिषाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. लंचनंतर तुनिषाने शीजानच्या मेकअप रुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
काही वेळाने शीजान मेकअप रुममध्ये जाण्यासाठी आला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. शीजानाने तनुषाच्या नावाने आवाज दिला. पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे अखेर शीजानने दरवाजा तोडला. पण आतलं दृष्य ऐकून शीजानला धक्का बसला. तुनिषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. शीजानने तात्काळ सेटवरच्या इतर लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तुनिषाला रुग्णालयात नेण्यात आलं.