जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी तारळे गाव व परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज ग्रामीण भागातील लोकांना उपचारांसाठी कराड किंवा सातारा येथे जावे लागत आहे. चांगल्या शिक्षणासाठी ही या शहरांमध्ये जावे लागते. म्हणूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चांगली अशी आदर्श शाळा आणि सर्व सोयींनी सुसज्ज असे एक आरोग्य केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे आपण जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास आरखडा तयार करण्यात येत आहे. नजिकच्या काळात डोंगरी तालुक्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील, असेही त्यांनी म्हंटले.