२० दिवसांमध्ये ५ लाख नवीन कोरोनाग्रस्तांची भर; वीस दिवसांत रुग्णसंख्या झाली दुप्पट

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाच्या आजाराने हैराण केले आहे. भारतात हि कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात ३४ हजार ८८४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दाखल झालेले ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये २२ हजार ९४२ रुग्ण बरे झालेत. तर ६९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात ६३.३३ % हा रेट रुग्ण बरे होण्याचा आहे.

मागील २० दिवसांमध्ये ५ लाख नवीन रुग्णांची भर पडली आहे. देशात २९ फेब्रुवारीला पहिला रुग्ण हा पुण्यात सापडला होता. देशातील रुग्णसंख्या पाच लाखांवर फक्त चार महिन्यात गेली. २६ जूनला कोरोना रुग्णांचा आकडा पाच लाख होता. आणि जुलै मध्ये बाधितांची संख्या शुक्रवारी १० लाखांच्या पुढे गेली. देशात लॉक डाउन सैल केल्यानंतर म्हणजेच देशात अवघ्या २० दिवसांत रुग्णवाढ दुप्पट झाली आहे . देशात आतापर्यंत करोनामुळे २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन लाख ५८ हजार ६९२ जणांवर उपचार सुरू आहेत.

अनेक शहरांत आणि ग्रामीण भागात कोरोना हा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आणि तेथील नागरिकांकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग हा वाढतच चालला आहे . त्यामुळे सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.