हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । adhaar Card Pan Card Link : आजपासून मार्च महिना सुरु झाला आहे. आता लवकरच पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली 31 मार्चची अंतिम मुदतही जवळ आली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नुकतेच जारी केलेल्या माहितीत म्हटले की,” जे पॅनकार्डधारक या मुदतीपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणार नाहीत, त्यांचे पॅन इनऍक्टिव्ह केले जातील. त्यामुळे उशीर न करता आजच आपले पॅन-आधार लिंक करा.”
आवश्यक सूचना!
आयकर अधिनियम, 1961 के अनुसार, सभी पैन धारकों के लिए, जो छूट की श्रेणी में नहीं आते हैं, 31.03.2023 से पहले अपने पैन को आधार से जोड़ना अनिवार्य है।
01.04.2023 से जो पैन आधार से नहीं लिंक किए गए हैं, वे पैन निष्क्रिय हो जाएंगे।
कृपया देर न करें, आज ही लिंक करें! pic.twitter.com/9Ji87PsFdb— Income Tax India (@IncomeTaxIndia) February 28, 2023
आधार कार्डमध्ये UIDAI द्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला जारी केलेला 12-अंकी नंबर असतो. हा एक ओळख क्रमांक आहे. भारताचा रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करता येते. जी मोफत आहे. एकदा नावनोंदणी केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचे डिटेल्स डेटाबेसमध्ये कायमचे सेव्ह केले जातात. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त आधार कार्ड काढता येणार नाहीत. adhaar Card Pan Card Link
जर आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर त्याविषयी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवणे आवश्यक आहे. आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून हे करता येईल. जर आपले पॅन-आधार लिंकिंग केले नाही तर आपले पॅन ‘इनऑपरेटिव्ह’ होईल. adhaar Card Pan Card Link
adhaar Card Pan Card Link करण्याची प्रक्रिया जाणून घ्या :
सर्वात आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई-फायलिंग पोर्टल उघडा – https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar b
येथे रजिस्ट्रेशन करा (आधी केलेले नसल्यास).
आपले पॅन कार्ड हा हाच युझर आयडी असेल.
युझर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
एक पॉप अप विंडो दिसेल, जी पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल.
तसे नसल्यास, मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.
पॅन डिटेल्सनुसार जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील आधीच नमूद केले जातील.
आता आपल्या आधारवर दिलेल्या तपशीलांशी स्क्रीनवर पॅन डिटेल्स व्हेरिफाय करा.
इथे हे लक्षात घ्या की, जर ते जुळत नसेल, तर यांपैकी कोणत्याही एका डॉक्युमेंटमध्ये त्याची दुरुस्ती करावी लागेल.
जर तपशील जुळत असेल तर आधार क्रमांक एंटर करा आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.
यानंतर एका पॉप-अप मेसेजद्वारे आपले आधार पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाल्याचे कळवले जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे नवीन भाव
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Charger : आपला फोन वारंवार चार्ज करण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या
Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या