हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । adhaar Card Pan Card Link : केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. मात्र, सरकारने अधिसूचित केल्यानुसार या नियमांमध्ये काही प्रमाणत शिथिलता देण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख याआधी अनेकदा वाढवण्यात आली आहे. मात्र, आता त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. तसेच जर यावेळी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासून आपले पॅन कार्ड इनव्हॅलिड होईल.
नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले होते कि, ‘आयकर कायदा, 1961 नुसार, ज्यांना सूट नाही त्यांनी 31 मार्च 2023 आधीच आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. अन्यथा, 1 एप्रिल पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल.’
पॅन-आधार लिंक करण्याची गरज कोणाला नाही?
मे 2017 मध्ये केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अनेक लोकांना सूटीच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या श्रेणीतील लोकांना आधारशी पॅन लिंक केले नाही तरीही कोणतीही अडचण येणार नाही. तसेच त्यांना 10,000 रुपये दंडही भरावा लागणार नाही. चला तर मग कोणाकोणाला यामधून सूट देण्यात आली आहेत ते जाणून घेउयात…
1. आसाम, मेघालय आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या लोकांना ते लिंक करणे बंधनकारक नाही.
2. आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी व्यक्तीने पॅनला आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही.
3. मागील वर्षात कधीही ऐंशी वर्षे किंवा त्याहून जास्त वय ओलांडलेल्या व्यक्तींसाठी ते बंधनकारक नाही.
4. भारताचा नागरिक नसलेल्या लोकांनाही ते बंधनकारक नाही.
पॅन कार्ड आणि आधार लिंक प्रत्येकासाठी बंधनकारक का आहे ?
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या सल्ल्यानुसार, 31 मार्च 2023 आधीच हे दोन्ही लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. ज्यामुळे लोकांना ITR भरण्यापासून किंवा पॅनशी संबंधित सर्व्हिसेस एक्सेस करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. adhaar Card Pan Card Link
अशा प्रकारे करा लिंक
आता आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड एसएमएस किंवा ऑनलाइनद्वारे लिंक करता येईल. SMS द्वारे आधारशी पॅन लिंक करण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.
याबरोबरच इन्कम टॅक्स पोर्टलला भेट देऊन आणि लागू लेट फीस किंवा 1000 रुपये भरून आपले पॅन कार्ड आधारशी ऑनलाइन लिंक करता येईल. adhaar Card Pan Card Link
आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: http://incometaxindiaefiling.gov.in
आपल्या आयडीची नोंदणी करा.
यानंतर आपला युझर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख वापरून पोर्टलवर लॉग इन करा. लॉगिन करण्यासाठी पॅन नंबर हाच युझर आयडी असेल.
पॅन आधारशी लिंक करण्यासाठी एक पॉप-अप विंडो दिसेल.
यानंतर मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि होमपेजवर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.
आधार कार्डवर नमूद केल्याप्रमाणे आपला पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव टाका.
लागू असल्यास,‘I have only year of birth in Aadhaar card’ या बॉक्सवर टिक करा.
व्हेरिफाय करण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड एंटर करा.
यानंतर Link Aadhaar बटणावर क्लिक करा.
जर आपण एंटर केलेले तपशील पॅन आणि आधार रेकॉर्डशी जुळत असतील तर ‘link now’ बटणावर क्लिक करा.
आता पॅन कार्ड आपल्या आधार कार्डशी यशस्वीरित्या लिंक केले जाईल.
यशस्वी लिंकिंग प्रक्रियेनंतर, आपला आधार पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे हे सांगणारा एक पॉप-अप मेसेज मिळेल. adhaar Card Pan Card Link
हे पण वाचा :
Bank FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! सरकारी बँका देत आहेत मजबूत रिटर्न
LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात खालच्या पातळीवरून सुधारणा, जाणून घ्या आजचे दर