व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, विचारांचे वारसदार नाहीत : गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आदित्य ठाकरें आताच वय 32 वर्षे आहे आणि मी शिवसेनेत 35 वर्षापासून काम करतोय. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा असा प्रतिप्रश्न शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्रात ‘50 खोके, एकदम ओके’ ही घोषणा चांगलीच गाजत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर सातत्याने टीका करत आहेत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला जात असून हे सरकार ‘खोके सरकार’ असल्याची म्हटले जात आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिप्रश्न केला आहे. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध राजकीय प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरेंना आमदार होण्यासाठी आश्वासनं द्यावी लागली. तेव्हा तुम्ही  नव्हे आम्ही खरे वारसदार आहोत, आम्ही पडल्यावरही उभं राहिलो आणि उभं राहिल्यावरही पडलो. आजपर्यंत एक नेता म्हणून आम्ही त्यांची इज्जत ठेवली आहे. त्यांनी वयाची आणि आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाहीतर आम्ही बोलण्याच इतके कठीण आहोत की त्यांना आवरणं मुश्कील होईल, असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.