व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मीही 30- 40 आमदारांना डांबून ठेवलं असतं : उध्दव ठाकरे

मुंबई | मला मुख्यमंत्री पदावर रहायचं असत तर 30-40 आमदारांना डांबून ठेवल असतं. “माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा”, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळावा नेमका कुणाचा? यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपली भूमिका मांडली आहे. अद्याप पोलिासांनी दसरा मेळाव्याला कोणाला परवानगी हे सांगितले नाही.

उध्दव ठाकरे म्हणाले, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरं आहे, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन”, असा इशाराही शिंदे- भाजप सरकारला दिला.