हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत दाखल झाले. प्रथम त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी अयोध्या दौऱ्यावेळी भाजपला टोला लगावला. “आज आम्ही अयोध्येत आलो आहोत. आणि आमचा हा दौरा राजकीय नसून हि एक तीर्थयात्रा आहे. राम मंदिर निर्माण होत असल्यामुळे शिव सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबई महानगर पालिकेत रामराज्य आणण्यासाठी रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत, जनतेला दिलेले वचन पाळलं हेच आमचं हिदुत्व, असे म्हणत मंत्री ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, आज अयोध्येत कोर्टाच्या निर्णयानंतर रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे याचा माझ्यासह प्रत्येक शिवसैनिकाला खूप आनंद होत आहे. अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना राहता यावे, त्यांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होणार नाही या याठिकाणी महाराष्ट्र सदन उभारण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रयत्न करणार आहेत. ते मुख्यमंत्री योगीजींशी या ठिकाणी महाराष्ट्र सदन व्हावे यासाठी पत्रव्यवहार करून परवानगी मागणार असल्याची माहिती यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
मी आज अयोध्यानगरीत आलो आहोत. माझा हा दौरा राजकीय नसून तो धार्मिक आहे. मी या ठिकाणी कोट्याही स्वरूपाचे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. मी तीर्थयात्रा म्हणून आलेलो आहे, असेही यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.