कोल्हापूर प्रतिनिधी | शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करिता कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव कार्यापासून मदत कार्यात अग्रेसर असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसहाय्य योजनेतून मदतकार्याचा ओघ सुरु आहे. या अनुषंगाने पाहणी करण्याकरिता आणि पूरग्रस्त नागरिकांना भेटून धीर देण्याकरिता शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या दि. २० रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
या दौऱ्या दरम्यान ते शहरातील शहरातील बापट कॅम्प परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप तर सीपीआर मधील पूरग्रस्त रुग्णांच्या विभागास देणार भेट देणार आहेत. सकाळी १०.३० वाजता बापट कॅम्प येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणार आहेत. यानंतर सकाळी ११.३० वाजता सीपीआर रुग्णालय येथील पूरबाधित रुग्णांच्या विभागास भेट देवून उपचाराची माहिती घेत रुग्णांची विचारपूस करणार आहेत.
कोल्हापूर करवीर विधानसभा मतदारसंघातील चिखली व आंबेवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना साहित्याचे वाटप, हातकणगले विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना साहित्याचे वाटप, कोल्हापूर शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना साहित्याचे वाटप आदी कार्यक्रम करून ते सायंकाळी सांगली कडे रवाना होणार आहेत, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur