विमानतळावरून उतरल की विधान भवनात जायचा रस्ता हा वरळीतून जातो; आदित्य ठाकरेंचा थेट इशारा

0
42
Aditya Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विमानतळावरून उतरल की विधान भवनात जायचा रस्ता हा वरळीतून जातो अस म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकप्रकारे गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. मुंबईत युवासेनेचा मेळावा पार पडला यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या अंगात जोश भरला.

आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा हे सर्व आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत उतरलीत, बांद्राहून येतील आणि वरळी, भायखळ्यातून त्यांना जावे लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे. एक फ्लोअर टेस्ट आत होईल तर दुसरी बाहेर होईल. तसेच केंद्र सरकार ही टेस्ट घडवून आणण्यासाठी केंद्रीय बळाचा वापर करेल पण शिवसैनिक शिवसैनिक आहेत अस म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला.

गेले अनेक वर्ष आपण  एकत्र आहोत. पण गेले दोन चार दिवस जे वातावरण आहे, त्यावरून एकच दिसतंय आता घाण निघून गेली, जे काही व्हायचं ते चांगलंच होणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले .एकाच गोष्टीचं मला आश्चर्य होतं, राजकारण म्हटल्यावर लोकं कसं बदलू शकतात हे पाहिलंच आहे. पण हाच प्रश्न येतो आम्ही यांना काय कमी दिलं असा सवाल आदित्य यांनी केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here