कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या काही दिवसात कोरोनाचे प्रमाण वाढायला लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध घातले असून सामाजिक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरीसुद्धा वाई तालुक्यातील बावधन येथे बगाड यात्रा तेथील काही लोकांनी साजरी केली. त्यामुळे यात्रा संयोजकांवर प्रशासन कारवाई करणार असल्याचे सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
वाई येथील बावधन मधे यात्रा साजरी करण्या संदर्भात प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला होता. यासंदर्भात प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सूचना जाहीर केली होती. तरीसुद्धा शुक्रवारी 2 एप्रिल रोजी यात्रा मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्रित साजरी केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या वर्षभरापासून कोरोना राज्यात आहे काही दिवसापूर्वी प्रमाण कमी झाले असल्याने निर्बंध कमी करण्यात आले होते, मात्र पुन्हा वरून जे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाने यात्रा-जत्रा तसेच गर्दी करणारे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. वाई तालुक्यातील बावधन येथील यात्रेबाबत ही प्रशासनाने दोन दिवसापूर्वी तेथील लोकांना योग्य त्या सूचना केल्या होत्या. मात्र तरीही तेथील लोकांनी संयोजकांनी यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली या लोकांनी दोन दिवसापूर्वी यात्रा साजरा न करण्याची भूमिका घेतली होती. प्रशासनाने सूचना देऊनही आज सकाळी यात्रा साजरी केली. त्यामुळे त्यांच्यावर ती प्रशासन व कारवाई करण्यात येणार आहे.