कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शहरात आग लागली तेथे व्यवसाय सोडून काही अनावश्यक गोष्टी दिसत आहेत. लोकवस्ती दाट असल्यामुळे अगीने राैद्ररूप धारण केले. प्रशासन ही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई करेल. शहरात अशाप्रकारे असणाऱ्या वस्ती, घरांवर प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
कराड शहरातील वेशा वस्तीत मध्यरात्री आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक साैरभ पाटील यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री यांनी स्थानिक रहिवाशांकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
बाळासाहेब पाटील म्हणाले, रात्री आग लागली, प्रशासन, नगरपालिकेने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ज्याच्या घराचे नुकसान झाले त्यांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. रस्ता तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अग्निशामक दलाची गाडी येण्यात अडचण आलेली आहे. त्यामुळे आता प्रशासन योग्य ती कारवाई करेल.