हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्यपाल हटाव अशी मागणी करत विविध संघटना आणि शिवप्रेमींकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आज पुण्यातील डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले आहेत. “आजचा हा मोर्चा बेकायदेशीर आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ उदयनराजे भोसले यांना अटक करावी,” अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट पोलिसांकडे संबधितांना अटक करण्याची मागणी केली. सदावर्ते यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत हा संविधानाच्या आधारावर चालतो. आजचा पुण्यातील बंद हा बेकायदेशीर आहे. लोकांना वेठीस धरून दुकाने बॅड करायला लावणे, मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र करून मोर्चा काढणे हे बेकायदेशीर आहे.
आजच्या बंदला सर्वस्वी उदयनराजे भोसले हेच जबाबदार असतील. कारण जे लोक दररोज शेतीमाल विकून आपला घरखर्च चालवत असतात. त्यांना आजच्या बंदमुळे नुकसान सोसावे लागत आहे. हि काय लग्न सराई आहे काय? आज बंद म्हंटल कि लगेच बंद ठेवायला लावायचे, अशी संतप्त प्रतिक्रिया ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.