काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या विरोधात जोरदार लढा देणाऱ्या अमरुल्ला सालेहच्या मोठ्या भावाला तालिबान्यांनी मारले आहे. रोहुल्लाह सालेहला मारण्यापूर्वी तालिबान्यांनी त्याच्यावर अत्याचार केले आणि नंतर निर्घृणपणे ठार केले. ही घटना पंजशीर मधील असल्याचे सांगितली जात आहे, जिथे अजूनही तालिबानचा संघर्ष सुरू आहे.
गुरुवारी रात्री तालिबान आणि नॉदर्न अलायन्स यांच्यात हिंसक चकमक झाल्याची माहिती मिळाली आहे. अमरुल्ला सालेहचा मोठा भाऊ त्यातच ठार झाला. तालिबानी लढाऊंनी रोहुल्ला सालेहवर खूप अत्याचार केल्याचे वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत या वृत्तासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. खुद्द अमरुल्ला सालेह कडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
पंजशीर स्वातंत्र्यासाठी लढला
पंजशीर हे तेच क्षेत्र आहे जिथे तालिबान सध्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) आणि नॉदर्न अलायन्सशी लढत आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा घेतला. मात्र, पंजशीरमध्ये नॉदर्न अलायन्सने स्वातंत्र्याचा संघर्ष सुरूच ठेवला. अशरफ घनी देश सोडून गेल्यानंतर अमरुल्लाह सालेहने पंजशीरच्या लढवय्यांना खुले समर्थन दिले. अनेक प्रसंगी तालिबान्यांना त्यांच्या बाजूने खुली चेतावणीही देण्यात आली आहे.