कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कोडोली विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीचा निकाल नुकताच लागला असून या ठिकाणी तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विरोधी गुरू गोदडगिरी महाराज शेतकरी विकास पॅनेलने 13- 0 असा पराभव करत विजय मिळवला आहे.
येथील विकाससेवा सोसायटीसाठी एकूण 757 मतदान पार पडले होते. यापैकी 733 मते वैध तर 24 मते बाद ठरली. कोडोली येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील व अतुल भोसले, कृष्णा कारखान्यांचे माजी चेअरमन अविनाश मोहिते समर्थकांनी एकत्रित विजय मिळवला आहे. या निवडणुकीत श्री गुरुवर्य गोदडगिरी महाराज ग्रामविकास पॅनेलचा पराभव झाला. कराड तालुक्यातील वारुंजी सोसायटी काँग्रेस 12/1 विजयी, जिंती सोसायटी काँग्रेस 12/1 विजयी, शेनोली सोयासायटी काँग्रेस 9/4 विजयी. तर तुळसण येथे 13-0 असा भाजपाचे डाॅ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पॅनेलने विजय मिळवला.
या निवडणुकीत अभिजीत श्रीरंग जगताप (429), निवास जगन्नाथ जगताप (388), महेंद्र जयवंत जगताप (393), शिवाजी तानाजी जगताप (386), हणमंत सिदु जगताप (371), कृष्णा रघुनाथ मोरे (355), नारायण हिंदुराव मोरे (368), काशिनाथ गोविंद साळुंखे (409), महिला राखीव मतदार संघातून- राजश्री भरत जगताप (429), शैलजा ज्योतीराम पाटील (371). अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघातून- युवराज बापू गोतपागार (413), इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून- मधुकर बाबुराव माने (429), विमुक्त जाती प्रवर्गातून- दत्तात्रय बाबू मदने (451) यांनी विजय मिळवला आहे.