अनिल देशमुखनंतर अनिल परब; सोमय्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला इशारा देत आता अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांचा नंबर लागणार असा दावा केला आहे.

शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली, गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात अखेर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल. दरमहा १०० कोटींची जी वसुली येत होती त्यातील पवार यांच्याकडे किती पैसे पोहचते व्हायचे आणि ठाकरेंकडे किती जायचे, याचे उत्तर आता द्यावे लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांची रात्री 12 पर्यंत म्हणजेच तब्बल 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment