हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या कोविडच्या काळात, सर्व काही ऑनलाईन ऑर्डर आणि डिलिव्हरी केले जात आहे. कोरोना काळात याला न्यू नॉर्मल असेही म्हणतात. रेशन, फूड, कपडे या सर्व गोष्टींसाठीही ऑनलाईन ऑर्डर दिली जाऊ शकते आणि तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी अगदी काही वेळातच मिळेल. नुकतेच आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपण जर हा मजेदार व्हिडिओ पहिला तर आपल्याला कळेल कि एक अशी ऑनलाइन डिलिव्हरी सेवा देखील उपलब्ध होऊ शकेल.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय एका माणसाला थोबाडीत मारताना दिसतो आहे. ब्रेकअपनंतर अनेक जोडपे एकमेकांवर सूड उगवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करतात. असाच एक मजेशीर सूड घेतल्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एका मुलीने डिलिव्हरी बॉयद्वारे तिच्या माजी प्रियकरासाठी भेट म्हणून 2 flirtatious slaps पाठवले आहेत. तेवढ्यात, डिलिव्हरी बॉय त्या व्यक्तीजवळ पोहोचतो आणि एकामागून एक त्याच्या दोन्ही गालांवर झापड देतो.
https://twitter.com/rupin1992/status/1414081915074666498?
ज्याला थोबाडीत मारली जाते त्याला डिलिव्हरी बॉयची ही विचित्र कृती समजत नाही, मग डिलिव्हरी बॉय त्याला सांगतो की, या चापटी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनेत्याच्यासाठी मागवल्या होत्या. थोबाडीत मारल्यानंतर तो त्या व्यक्तीची स्वाक्षरी स्लिपवरही घेतो. जाता जाता डिलिव्हरी बॉय त्याला सांगतो की, त्याची एक्स गर्लफ्रेंडने त्याला आणखी चापट आणि बुक्क्या मारू इच्छित होती पण ते तिच्या बजटमध्ये नव्हते.
हा मजेदार व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ऑनलाइन डिलिव्हरी सर्व्हिसचा प्रयत्न करा, आजकाल कोणतीही गोष्ट ऑनलाइन दिली जाऊ शकते’.
लोकं हा मजेदार व्हिडिओच नुसता शेअर करत नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेदार कमेंटही करत आहेत. एका युझरने कमेंट करताना लिहिले की, ‘ही सर्व्हिस भारतात उपलब्ध असेल तर मला त्याची खूप गरज आहे’. तर दुसर्या एकाने लिहिले की, ही सर्व्हिस फक्त महिलांसाठीच आहे. अनेक लोकांनी हसणार्या इमोजी शेअर केल्या आणि व्हिडिओला आश्चर्यकारक म्हटले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा