हिंजवडीत आल्यानंतर अमेरिका- इंग्लंडमध्ये आल्यासारखे वाटतं- शरद पवार

SHARAD PAWAR IT PARK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बोललेला शब्द हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. पुण्यातील हिंजवडी येथे IT पार्क उभारण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनी याच IT पार्क बद्दल विधान करत म्हंटल कि, हिंजवडीचे आयटी पार्क म्हणजे भारतातील इंग्लंड आणि अमेरिकेची झलक आहे. चिंचवडच्या जैन विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत असताना शरद पवारांनी हिंजवडीची तुलना अमेरिका आणि इंग्लंडशी केली आहे.

हिंजवडीचे पालटले रुपडे

हिंजवडीत साखर कारखाना उभा करण्याच्यावेळी शरद पवारांनी त्या जागेचे उदघाटन केले खरे मात्र तिथे  साखर कारखाना उभारला जाणार नाही. त्याऐवजी इथे एक भव्य दिव्य असे आयटी पार्क उभारले जाण्याची घोषणा करत पवारांनी अनेकांना धक्का दिला होता. आणि त्याच IT पार्कचे रुपडे एका वेगळ्याच वळणार येऊन ठेपले आहे. शरद पवार म्हणाले, साखर कारखाना निर्माण करा अशी मागणी लोकांची होती. मात्र त्या जागी IT पार्क उभा करून कारखान्यासाठी वेगळी जागा शोधली जावी असे मी माझ्या भाषणात त्यावेळी म्हणालो होतो. आणि आज हिंजवडीत आले की मला अमेरिका आणि इंग्लंड मध्ये आल्यासारखे भासते”.

पिंपरी चिंचवड IT हब म्हणून ओळखले जाते – शरद पवार

पिंपरी चिंचवडचा उल्लेख करत पवार म्हणाले की, एकेकाळी पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. टेल्को आणि बजाज कंपनीच्या चांगल्या कामामुळे तिथे औद्योगिक बरोबरच शैक्षणिक बदल झाल्यामुळे आता चिंचवड हे IT हब म्हणून नावारूपाला आले आहे. असेही त्यांनी ह्यावेळी सांगितले. तसेच शहराची वार्षिक निर्यात ही 11 हजार कोटी रुपये होते. ह्याचाही उल्लेख त्यांनी ह्यावेळी केला.