अहमदनगर । राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ काल बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्यादृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. नगर येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
याप्रसंगी दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी अजित पवार यांना विचारल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई-पुण्याच्या सह सर्व राज्यांमध्ये योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत व पोलीस सुद्धा आता अलर्ट झाले आहेत, अशी माहिती त्यांनी अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, दिल्लीमध्ये शुक्रवारी आयईडी स्फोट घडवून आणला गेला. त्यानंतर देशातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारी देखील अलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री पवार तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच चर्चाही झाली होती. त्यानंतर आज नगरमध्ये पवार आले असता त्यांनी राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.