हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेत बुधवारी नवीन कामगार विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी तीन कामगार संहितांवरील बिले पास झाली. या नव्या कामगार कायद्यामुळे देशातील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही कामगारांना बर्याच नवीन सुविधा मिळतील. ज्यामध्ये सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक असेल. तसेच त्यांचा पगार हा डिजिटल पद्धतीने द्यावा लागेल. वर्षातून एकदा सर्व कामगारांची आरोग्य तपासणी देखील आता अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योजकांचा व्यवसाय सुकर करण्यासाठीही अनेक तरतुदी आणल्या गेल्या आहेत.
कामगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, “सध्याच्या कायद्यात दंडाची रक्कम अपघात झाल्यास सरकारच्या खात्यात जाते, परंतु आताच्या या नव्या कायद्यात दंडाची 50 टक्के रक्कम पीडिताला दिली जाईल.”
गंगवार म्हणाले की, “देशाच्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगार कायद्यात बदल करण्यात येत आहेत, जे मालक आणि कामगार दोघांसाठीही फायद्याचे ठरतील. वेतन कोड आधीपासून सूचित केले गेले आहे. जुने 29 कायदे ‘या’ चार संहितेत समाविष्ट केले गेले आहेत.”
लोकसभेनंतर आता राज्यसभेत ‘हि’ तीन कामगार बिले मंजूर झाली
(1) Occupational Safety, Health & Working Conditions Code
(2) Industrial Relations Code
(3) Code On Social Security
खालच्या सभागृहात या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले की, “प्रवासी कामगारांबाबत सरकार अत्यंत संवेदनशील आहे. आता प्रवासी कामगारांची डेटा बँक तयार करण्याची तरतूद केली जात आहे.” ते पुढे म्हणाले की,” प्रवासी कामगारांना त्यांच्या मूळ निवासस्थानावर जाण्यासाठी वर्षातून एकदा मालकांनी प्रवास भत्ता द्यावा अशी व्यवस्था केली जात आहे.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.